फलटण : महान्यूज लाईव्ह
फलटण शहरातील अतुल प्रकाश नायर हा विद्यार्थी युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकला होता. तो मायदेशी सुखरूप पोहोचल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्याचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनूप शहा, गटनेते अशोकराव जाधव, युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सुशांत निंबाळकर ,शहराध्यक्ष अमोल सस्ते, माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, नगरसेवक सचिन अहिवळे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक राजेश शिंदे यांच्याबरोबर समस्त नायर परिवार उपस्थित होते.
यावेळी अतुल यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. जगातील इतर देशांनी आपापल्या देशातील मुलांना कसलीही मदत केली नाही. परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सातत्याने लक्ष घालून आपल्या देशातील मुलांना आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. भारताचे त्या देशातील राजदूत खूप मेहनत घेत आहेत. प्रत्येक भारतीयावर लक्ष ठेवून अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे अतुल नायर यांचे वडील प्रकाश नायर यांनी सांगितले. मुलगा सुखरुप घरी आल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नायर परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.