• Contact us
  • About us
Saturday, May 21, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाईत रिव्हॉल्वरसह सापडलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिस कोठडी ! तडीपार सचिन येवले मुख्य आरोपी !

tdadmin by tdadmin
March 7, 2022
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
वाईत रिव्हॉल्वरसह सापडलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिस कोठडी ! तडीपार सचिन येवले मुख्य आरोपी !

वाई : महान्यूज लाईव्ह

वाई -मेणवली रस्त्यावरील राजयोग कृषी पर्यटन हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना रविवारी रिव्हॉल्वरसह वाई पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने फिल्मीस्टाईलने धाड टाकून रंगेहाथ पकडले होते. एक तडीपार गुंड पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. पोलिस तपासात या टोळीचा म्होरक्या तडीपार सचिन येवले हा असल्याचे स्पष्ट झाल्याने वाई पोलिसांनी त्याला मुख्य आरोपी केले असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सांगितले.

पाचही गुन्हेगारांवर सातारा व इतर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान रिव्हॉल्वरचा वापर घातपात करण्यासाठी होणार होता की अन्य गुन्हा करण्यासाठी, यादिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाई – मेणवली रस्त्यावर राजयोग कृषी पर्यटन या हॉटेलमध्ये सहा सराईत गुन्हेगार पार्टीसाठी आले असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ त्यांनी डी बी पथकाला याबाबतच्या सूचना देऊन सर्वाना ताब्यात घेण्याच्या आदेश दिले होते.

डीबी पथकाने फिल्मीस्टाईल राजयोग हॉटेलवर धाड टाकली यावेळी त्याठिकाणी साहिल सय्याज इनामदार वय वर्ष २२ रा. सातारा , राहुल अण्णासाहेब कदम वय वर्ष २८, रा. खोजेवाडी, ता. सातारा , महेंद्र लक्ष्मण गायकवाड, वय वर्ष २८ ,सागर अनिल पडवळ, वय वर्ष २७, रा. शेंद्रे, सादिक अय्याज बागवान, वय वर्ष १७, रा. गुरुवारपेठ, सातारा या पाच आरोपींना ताब्यात घेतले.
परंतु यादरम्यान सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षासाठी तडीपार असलेला सागर संदीप साबळे वय वर्ष २६ हा गुंड पळून जाण्यात यशस्वी झाला त्याला पकडण्यासाठी वाई पोलिसांनी रविवारी रात्री सर्वत्र नाकेबंदी करून पोलीस पथके रवाना केली. मात्र अद्याप तो अजून मिळून आला नाही.

सोमवारी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांकडे कसून चौकशी केली. यामध्ये आम्हीं सर्व हॉटेल मालक सचिन येवले यांच्याकडे आलो असल्याचे सांगितले. येवले हाही जिल्ह्यातून तडीपार आहे. त्याच्या सांगण्यावरूनच सहाजण वाईत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रक्रियेत येवले हाच सूत्रधार असल्याने पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात मुख्य आरोपी केला असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस निरीक्षक भरणे यांनी सांगितले. तडीपार साबळे यालाही लवकरच गजाआड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेला साहिल याच्यावर तीन, साबळे यांच्यावर सात, येवले याच्यावर चार व इतरांवर प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून सर्वजण सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले. त्यामुळे वाई तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या धाडसी कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,व त्याच्या टीमचे कौतुक होत आहे.

Previous Post

जिल्हा सहकारी बँक व विकास सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी सक्षम – अरुण प्रसाद !

Next Post

युक्रेनमधून परतला फलटणचा विद्यार्थी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मानले आभार !

Next Post
युक्रेनमधून परतला फलटणचा विद्यार्थी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मानले आभार !

युक्रेनमधून परतला फलटणचा विद्यार्थी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मानले आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

May 20, 2022
वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

May 20, 2022

बारामतीसह राज्यातील करिअर अकॅडमींच्या नफेखोरीचा बाजार उठणार? भरमसाठ शुल्कातून पालकांची सुटका होणार? राज्य शासनाने घेतली गंभीर दखल!

May 20, 2022

चक्क ‘बारामती’तून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आंबे पाठवले..! भसाळे यांचं निर्यातीचं ‘इंद्रधनुष्य’! महाराष्ट्रासह ‘बारामती’चा अमेरिकेत रोवला झेंडा..!

May 20, 2022

दुर्दैवी : पाहुण्याच्या गावात आलेल्या पाच जणी भाटघर धरणात बुडाल्या..! तिघींचे मृतदेह सापडले!

May 19, 2022

मुळशीमध्ये अविनाश बलकवडे यांनी आयोजित केला ‘धर्मवीर’ चा मोफत शो!

May 19, 2022

देवेंद्र फडणवीस उद्या (शुक्रवारी) इंदापुरात! नीरा नरसिंहपूरचा करणार दौरा!

May 19, 2022

मळद दरोड्यातील फरार अट्टल दरोडेखोरास यवत पोलीसांनी केले जेरबंद!

May 19, 2022
मतदानासाठी गावी निघालेल्या जोडप्याचा अपघात; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर..

बारामतीत एमआयडीसीतील कंपनीत एका कामगाराचा मृत्यू ! डोक्यात लोखंडी रॉड पडला !

May 19, 2022
१४ वर्षाच्या वनवासानंतर बेपत्ता भोई परतले ! कुटुंबियांनी काढली जंगी मिरवणूक !

१४ वर्षाच्या वनवासानंतर बेपत्ता भोई परतले ! कुटुंबियांनी काढली जंगी मिरवणूक !

May 19, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group