मुंबई : महान्यूज लाईव्ह
पत्रकारिता हे अधिसारा व्रत आहे. जे घडते आहे ते लोकांसमोर आणण्याचे काम प्रत्यक्षात किती कठीण आहे, याची एक झलक युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धाच्या वेळी जागेवर जाऊन वार्ताकंन करणाऱ्या पत्रकाराच्या उदाहरणावरून दिसून येईल.
युक्रेनच्या अनेक शहरात सध्या रशिया बॉम्ब फोडत आहे. अनेक शहरात रशिया आणि युक्रेन यांच्यात गोळीबार सुरु आहे. मिसाईल हल्ले सुरु आहेत. ही सगळे आपल्या घरातील टिव्हीच्या स्क्रीनवर दिसते आहे. पण ही माहिती आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी काही पत्रकार आपला जीव धोक्यात घालत आहेत.
इंडिया टुडे आणि आजतकच्या पत्रकारांची टीमही अशीच युद्धग्रस्त युक्रेनमध्ये प्रत्यक्ष जागेवरून रिपोर्टींग करत आहे. काल युक्रेनची राजधानी किव्हजवळील इरपीन शहरावर रशियन सैन्याने बॉम्बवर्षाव केला. आजतकचे रिपोर्टर राजेश पवार या शहरातून लाईव्ह माहिती देत होते. त्यावेळी त्यांच्या इतक्या जवळ एक बॉम्बचा स्फोट झाला, की त्यांना जमिनीवर लोळण घ्यावी लागली. या स्फोटानंतर लगेचच युक्रेन आणि रशियन सैनिकांमध्ये गोळीबार सुरु झाला. राजेश पवार हे जमिनीवर झोपूनच या घटनेचे चित्रिकरण करत होते. त्यामुळे हे सगळे दृश्य लोकांसमोर आहे.
खरी पत्रकारिता कशी असावी, याचे एक उत्तम उदाहरण आहे. सुरक्षित जागी बसून सरकारी एजन्सी देत असलेल्या फुटेजच्या आधारे बातमीदारी करणारांनी राजेश पवारांसारख्या पत्रकाराचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.