दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड येथे रेल्वे विभागात चीप लोको इंन्सपेक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाराला पोलीस असल्याचे सांगत गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या एकुण १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी ( दि. ५) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दौंड – कुरकुंभ रोडवर असलेल्या गोलराऊंड येथे घडली.
धर्माराव मुनिय्या मलाका ( वय ७२, रा.दौंड) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. हे गाडीवर घरी जात असताना गोलराऊंडवर वाहन आडवुन एका व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगत वाहनाची व अंगाची झडती घ्यावयाची आहे असे सांगितले. झडती घेण्याचा बहाणा करून गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या, ३५ ग्रँम सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल घेवून हा चोरटा पसार झाला.
याबाबत धर्माराव मुनिय्या मलाका यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या डमी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.