बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील हॉटेल चैत्रालीला आज सकाळी अचानक आग लागली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या आगीत हे हॉटेल पुर्णपणे जळून खाक झाले आहे. ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या आगीची माहिती मिळताच बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र या आगीत हे हॉटेल जळून खाक झाले असून शेजारील इमारतीलाही मोठे नुकसान झाले आहे.