• Contact us
  • About us
Saturday, May 21, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विपश्यना–मानवतेसाठी एक अमूल्य देणगी

tdadmin by tdadmin
March 5, 2022
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

विपुल अभय शहा, बारामती, पुणे,
मनोविकास आणि शिक्षणतज्ञ
मानसिक समुपदेशक

vipul.shaha@post.harvard.edu

” अत्ता ही अत्तनो नाथो अत्ता ही अत्तनो गति “
अर्थात मीच माझा मालक आहे, मीच माझा भाग्य विधाता आहे–गौतम बुद्ध, धम्मपद, गाथा ३८०

मी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ, पुज्यनीय एस.एन. गोयंकाजी आणि त्यांचे गुरु सयागी उ बा खिन यांनी
शिकवलेल्या विपश्यना ध्यानाची साधना करीत आहे. माझ्या वडिलांनी वयाच्या १७ व्या वर्षी मला यवुकांच्या
( टीनएजर ) कोर्सला बसवून माझी आणि विपश्यनेची ओळख करून दिली. त्यावेळेस मी नुकताच अमेरिकेहून एक वर्षाचा ‘ रोटरी युथ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम ‘ पुर्ण करून आलो होतो आणि ‘रिव्हर्स कल्चरल शॉक’ ( विपरीत
सस्ंकारांचा धक्का ) च्या अनभुवाने अस्वस्थ होतो. माझ्या गावाच्या वातावरणात, जिथे मी लहानाचा मोठा झालो होतो, तिथे परत रुळणे मला कठीण जात होते. पाश्चिमात्य देशाच्या मोहजाळात अडकून मी माझ्या सांस्कृतिक मुळापासून दुर गेल्यामुळे, बराच काळ माझे स्वतःचे कुटुंब आणि मित्र पण मला परके झाले होते. अशा अशांत पार्श्वभूमीतून आचार्य गोयन्काजी आणि समवयस्क साधकांच्या शुभ सहवासात घालवलेले ते मौन ध्यान साधनेचे सात दिवस, माझ्या आयुष्यातल्या सर्वात गंभीर आणि महत्वपुर्ण परिवर्तनाला कारणीभूत ठरले. त्या युवा
शिबिरात मला अनायासे माझ्या अहंकाराच्या संपूर्ण विघटनाचा साक्षात्कार घडला आणि मी सर्व जीवांसाठी अपार कृतज्ञता आणि प्रेमाने भरून गेलो. तो अनभुव क्षणिकच होता पण मला एका विस्तृत अस्तित्वाची जाणीव करून गेला. विपश्यनेआधी ही गोष्ट माझ्या तर्कशुद्ध (rational) मनाच्या आकलनापलीकडची होती.

तदनंतर माझ्या धर्माच्या मार्गावरच्या प्रवासाला उत्तरोत्तर चालना मिळत गेली. मी नुकतेचे माझे प्रथम वीस दिवसीय विपश्यना शिबीर पुर्ण केले आणि या सुंदर मार्गाबद्दलचे सार तुमच्या पुढे मांडण्याची स्फूर्ती मला मिळाली. मला आशा आहे की हा माझा अनभुव इतर इच्छुकांना ह्या मार्गावर चालण्यास आणि प्रगती करण्यास प्रेरणा देईल.

हा मार्ग साधा असला तरी कठीण आहे. याला शब्दात व्यक्त करणे सोपे नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो आणि त्याप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलू शकतात. तरी मी नम्रपणे पुढील शब्दांत ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

” विपश्यना, ज्याचा अर्थ आहे यथा-भुत ज्ञान दर्शन म्हणजे जे जसे आहे त्याला तसेच बघणे, त्याच्या खऱ्या स्वरूपात बघणे ; ही ध्यानाच्या सर्वात प्राचीन विधींमधील एक आहे. विपश्यना ही स्वदर्शनातून स्वतःमध्ये बदल घडवण्याची कला आहे. जस जसे आपण शरीरात होणाऱ्या बदलांना, जे संवेदनांच्या रूपाने प्रकट होत असतात, साक्षी भावाने
बघायला लागतो, त्यावेळी कितीतरी इतर सत्ये आपोआप प्रकट होऊ लागतात. आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदनांना चालवणारे वैज्ञानिक नियम स्पष्ट होतात. प्रत्यक्ष अनभुवातून , मनुष्य कसा पुढे जातो किंवा मागे पडतो, दु:ख कसे उत्पन्न करतो किंवा स्वतःला दु:खातून कसे मुक्त करतो हे समजते. जीवनात जागरूकता वाढते, अज्ञान
कमी होते. स्वतःवर नियत्रंण ठेवता येते आणि जीवनात शांततेचा सुगंध दरवळतो. या गैर-सांप्रदायिक विद्येचा
उद्देश मानसिक विकारांचे संपूर्ण निर्मूलन आणि परिणामस्वरूप सर्वोच्च आनंदाला प्राप्त होणे आहे.”
(dhamma.org)

विशेष म्हणजे ध्यान करणाऱ्याला ‘काहीच करायचे नाही ’. सराव विधी म्हणजे आपला श्वासोच्छवास आणि
शारीरिक संवेदनांबद्दल क्षणोक्षणी, संपूर्ण समता भावाने ‘फक्त जागरूक राहणे ’ हेच आहे. असे ‘ काहीही न करणे ‘ अगदी सोपे वाटत असले तरी मानवी मनासाठी ही कदाचित सर्वात कठीण गोष्ट आहे. याचे कारण– मनाची सतत स्वतःला व्यस्त किंवा विचलित ठेवण्याची जुनी सवय, प्रतिक्रिया देण्याची किंवा बाह्य क्रियाकलापांमध्ये पलायन करण्याची प्रवृत्ती इ. डोळे बंद करून शांत बसण्याचा प्रयत्न करताच मन बंड करू लागते, भूतकाळात किंवा भविष्यात भटकायला लागते. आनंद मिळवण्याची आणि दु:ख किंवा अस्वस्थतेचा द्वेष करण्याची मनाची सततची प्रवृत्ती देखील एखाद्याला लक्षात येऊ लागते. एक महत्वाचा शोध लागतो – आपल्या मनाचा स्वभाव आणि त्याच्या सवयी. हे ‘काहीही न करणे’, जागरूक राहणे आणि प्रतिक्रिया न देण्यामुळे आपल्या सुप्त मनात खोलवर रुजलेले कर्म-संस्कार
( सवयी ) उभारून वर येतात. कोणताही विशिष्ट विचार, भावना किंवा अनुभवाला महत्व न देता प्रत्येक क्षणाला जे काही उलगडत आहे ते आपण फक्त साक्षी भावाने बघायला लागतो. आपला श्वास आणि शरीर ह्यांचा मनाशी घनिष्ठ सबंध असल्यामुळे जागरूक राहण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. सतत जागरूक राहिल्याने, एखाद्या शस्त्रक्रियेप्रमाणे खोलवर जाऊन आपल्या मनाच्या स्वभावात आमूलाग्र बदल घडू् लागतात.

ज्या प्रकारे आरसा आपल्याला आपले बाह्यरूप स्पष्टपणे पाहण्याची संधी देतो, त्याचप्रमाणे विपश्यना आपल्याला आपले आतंरिक वास्तव स्पष्टपणे पाहण्याची संधी देते.

जागरूकता आणि समताभाव ह्यांच्या संयुक्त सरावाने अंर्तज्ञानाचा उदय होतो आणि नवीन दृष्टीकोन उलगडतात.फरक अगदी स्पष्ट दिसतो – जणु वर्षोनुवर्षे धुराने अंधुक झालेली खिडकीची काच पुसायला घेतली की थरावर थर (अज्ञान आणि कर्मसंस्कारांचे ) स्वच्छ होऊ लागतात आणि सुर्यप्रकाश त्यातून अधिकाधिक तेजाने प्रकट होऊ लागतो. ‘ जे जसेआहे त्याला तसे ‘ स्पष्टपणे बघता आल्यामुळेही यात्रा सुकर होते.
ज्याप्रमाणेअॅंटी व्हायरस सॉफ्टवेअर, सिस्टमचे संरक्षण करण्यासाठी कॉम्प्युटर स्कॅन करते, त्याप्रमाणे या स्व – दर्शनाच्या प्रक्रियेतून सुक्ष्मातिसूक्ष्म व ऊर्जेच्या स्तरावर काम करत असलेल्या ह्या शरीर-चित्त प्रपंचाला सतत स्कॅन करता येते.

जैव -रासायनिक प्रक्रिया आणि विद्युत -चुबंकीय लहरींच्या रूपात प्रकट होणाऱ्या शारीरिक सवंदेनांचा क्षणोक्षणी उदय आणि व्यय होत असतो याची जाणीव होऊ लागते. आपला प्रत्येक लहानसा विचार आणि आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना यांचा आपल्या आतंरिक वास्तवावर कसा परिणाम होतो याबद्दल आपण आता अधिक जागरूक होऊ शकतो.
प्रत्येक क्षणी, आपल्याला एक पर्याय मिळत असतो – प्रिय-अप्रिय संवेदनांवर प्रतिक्रिया देणे ( जी आपल्या मनाची सवय आहे ) अथवा त्यांचे साक्षी भावाने निरीक्षण करणे. सवयीचे गुलाम आणि यंत्रवत जगण्याऐवजी जागृत आणि कुशल स्वरूपाने आयुष्याची वाटचाल करता येते. वादळातही शांत राहण्याची आपली क्षमता नैसर्गिकरित्या वाढू
लागते. दु:ख असले तरी प्रत्येक क्षणी अनभुवाच्या स्तरावर अनित्य बोध पुष्ट होऊ लागतो, ज्यातून परिस्थितीचा स्वीकार करता येतो आणि निष्काम कर्म करणे सोपे होते.

सर्वार्थाने अंतर्मनात खोलवर जाता येते. आपण जितके खोल जाऊ तितक्या खोलवर दडलेले राग, द्वेष आणि मोहाचे ( अज्ञानाचे ) संस्कार मुळापासून उपटून काढता येतात. ‘ मुक्ती ’ हे एखाद्या दुष्कर यात्रेचे शेवटी भेटणारे फळ नसून ती एक सततची प्रक्रिया आहे, ज्याची जागरूक राहून निवड करणे प्रत्येक क्षणी आपल्या हातात आहे ही जाणीव होऊ लागते.

माझ्या एका प्रदीर्घ मौन ध्यानसत्रा दरम्यान, एक चित्र माझ्यासमोर आले – ते म्हणजे घोड्यावर बसलेला योद्धा, त्यावर सर्व बाजूंनी हल्ला, जखमी आणि रक्तबंबाळ – पराकाष्ठेची ती वेदना होती. तथापि , काहीतरी होते ज्यातून मला जागरुक आणि निर्धास्त राहण्याची शक्ती मिळाली. ९० मिनिटांहून अधिक मौन आणि अचल राहिल्यानंतर, जेव्हा मी माझे डोळे उघडले, तेव्हा नकळत अश्रू वाहू लागले. खोलात धरून ठेवलेले एखादे खूप जूने दु:ख संपून माझ्या
छातीवरचे एक मोठे ओझे हलके झाल्यासारखे वाटले. भगवान गौतम बुद्ध यांनी २५०० वर्षांपूर्वी ही विद्या पुन्हा
शोधून काढली आणि मोठ्या करुणेने संपूर्ण मानवतच्या कल्याणासाठी तिचा प्रसार केला. विपश्यना आणि बुद्धाच्या काळापासून गुरु-शिष्य परंपरेद्वारे अनेक शतके या विद्येचे पावित्र्य राखणाऱ्या सर्व गुरूंबद्दल माझे मन कृतज्ञतेने
भरून आले.

या सर्वांचा अर्थ असा आहे का, की मी आता निर्वाण प्राप्त केले आहे– माझे मित्र मला गमतीने विचारतात ! ती खूप दूरची गोष्ट आहे ! त्याऐवजी, अशी नम्र जाणीव मला आहे की पूर्ण मुक्तीचा हा मार्ग लांब आणि कठीण असला तरी एकएक करून आपल्या जुन्या संस्कारांतून मुक्त होत जाण्याची संधी प्रत्येक क्षणी माझ्या हातात आहे.
‘ वयधम्मा सङ्खारा, अप्पमादेन सम्पादेथ ’
” सर्व कर्म संस्कार नश्वर आहेत, आळस न बाळगता मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करत रहा. “
( गौतम बुद्ध, महापरिनिर्वाण सुत्त , गाथा १८५)

विपश्यना परंपरेतील काही ठळक पैलू ,ज्यांचे मला खरोखर कौतकु वाटते, खाली देत आहे.

● सर्वसर्मावेशक– ह्यात सर्वांचे स्वागत आहे ! मानव जातीचे दु:ख कमी करण्यासाठी विपश्यना विद्येचा सार्वजनिक उपयोग करता येईल. वंश , धर्म, संस्कृती , सामाजिक-आर्थिक स्थिती, जाती , लिंग किंवा वय याची पर्वा न करता जो कोणी परिश्रमपूर्वक सराव करेल त्याला त्याचा फायदा होईल. तुरुंगात सुद्धा ह्या साधनेतून मूलभूत बदल घडले आहेत. धर्माचे मूळ स्वरूप परोपकार आहे. ते हिमालयातील शुद्ध पाण्यासारखे आहे. जो कोणी त्याचा एक घोटही घेईल, त्याचे उत्थान होईल.

” धर्म न हिन्दू बौद्ध है, सिख न मुस्लिम जैन , धर्म चित्त की शुद्धता धर्म शांति सुख चैन ” ।
—एस.एन. गोयंकाजी

● एक मौल्यवान भेट– धर्म खरोखरच अमुल्य आहे ! शिबिराला उपस्थित राहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. जुने साधक ज्यांनी ह्या शिबिरांची आणि तेथे शिकवल्या जाणाऱ्या धर्माची खोली आणि सौंदर्याचा आस्वाद घेतला आहे, त्यांच्या दानातून ह्या शिबिरांचा खर्च चालतो. जगभरात २०० हून अधिक विपश्यना केंद्रे सुरू झाली आहेत आणि असंख्य , अज्ञात लोकांच्या मनःपूर्वक दिलेल्या योगदानामुळे ती सेंद्रियपणे वाढत आहेत.
● अनभुवात्मक – सपंर्णू मार्ग दर क्षणी बदलणाऱ्या सत्याचा साक्षात्कार घडवतो. ह्या प्रवासात सत्याचा प्रत्यक्ष अनभुव याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सूचना आणि तात्विक सिद्धांतांची चर्चा कमीत-कमी असून सरावातनू अनभुव आणि अनभुवातून समज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो.
● वैज्ञानिक– ही विद्या वैज्ञानिक सिद्धांतांवर आधारित आहे- ह्यात आपण निसर्गाच्या नियमांना धरूनच चालतो आणि म्हणूनच ती प्रभावीरित्या कार्य करते ! अनेक संशोधन-प्रकल्पांतून आधुनिक काळात
विपश्यनेची प्रासंगिकता आणि लाभ सिद्ध केला गेला आहे.
● मूलभूत – विपश्यनेमध्ये मानवी दु:खाचे मूळ कारण अज्ञान ( अविद्या ) म्हणनू ओळखले जाते आणि
दु:खाच्या खऱ्या स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान ( प्रज्ञा ) जागृत करून त्याचे निराकरण केले जाते.
● कालातीत– ही विद्या देश आणि कालबंधनांच्या पलीकडे आहे. भूतकाळात पण सर्वांचे मंगल करत होती, वर्तमानात ही मंगल करत आहे आणि भविष्यात पण सर्वांचे मंगल करत राहणार आहे.
● भक्कम पाया– ही विद्या मूलभूत नैतिक नियम ( शील ) आणि मनाची एकाग्रता ( समाधी ) यांच्या मजबूत आधारावर साधकाला अतंर्दृष्टी ( प्रज्ञा ) पर्यंत पोचवते. हा पाया भक्कम नसल्यास, स्वतःची फसवणूक होण्याचा किंवा आध्यात्मिक मायाजाळात हरवण्याचा धोका असतो.

● मैत्री – फक्त स्वतःच्या प्रगती आणि आध्यात्मिक फायद्यासाठी काम करणे हे स्वार्थी आणि अनावश्यक
वाटू शकते. पण विपश्यनेसोबत नेहमी मैत्री भावनेची साधना केली जाते. ज्यात आपण सर्वांसाठी मैत्री,
करुणा आणि कृतज्ञतेचा भाव जागवतो. मन शांत आणि कोमल होते आणि आपल्याच स्वार्थासाठी काम न करता पूर्ण मानवजातीच्या सुखासाठी काम करताना मैत्रीचे तरंग आपल्या मन, वाचा आणि कृतिद्वारे
सभोवताली पसरतात.
● आत्मनिर्भरता आणि अनुशासन– ही विद्या साधकांनी आत्मनिर्भर होण्यावर जोर देते. ही व्यक्तिनिष्ठ किंवा एखाद्या गुरुवर भर देणारी साधना नाही तर स्वेच्छेने पत्करलेले नियम आणि अनुशासन पाळत आपली प्रगति स्वतः साधण्याचा मार्ग आहे.

“ प्रयत्न तुम्ही स्वतः करायचा आहे, बुद्ध फक्त मार्ग दाखवतात. ”
–गौतम बुद्ध, धम्मपद, गाथा २७६

महत्वाची सूचना :

१० दिवसांचा कोर्स पूर्ण केल्याशिवाय विपश्यनेचा सराव करणे उचित नाही, ” ही विद्या ( विपश्यना ) केवळ अशाच शिबिरामध्ये शिकली पाहिजे जेथे साधनेला लागणारे योग्य वातावरण आणि प्रशिक्षित मार्गदर्शक असतील. ध्यान ही
एक गंभीर बाब आहे, विशषेत: विपश्यना ध्यान, जे अन्तर्मनाशी सबंधित आहे म्हणून विपश्यनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीही उथळ किंवा वरवरच्या स्तरावर असू नये ” ( ‘आर्ट ऑफ लि व्हिंग ‘ या पुस्तकात विल्यम हार्ट )

विपश्यना ध्यानाबद्दल अधिक माहितीसाठी आणि /किंवा १०-दिवसीय अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यासाठी, कृपया येथे भेट द्या:
http://www.dhamma.org
http://www.vridhamma.org

भाषांतर: शुभा मेहरोत्रा

Previous Post

फटका सोसायला तयार रहा ! पेट्रोल, डिझेल दरांचा उडणार भडका ! विधानसभा निवडणूक संपण्याचीच वाट !

Next Post

बारामतीत हॉटेल चैत्राली आगीच्या भक्षस्थानी ! पुर्णपणे जळून खाक !

Next Post

बारामतीत हॉटेल चैत्राली आगीच्या भक्षस्थानी ! पुर्णपणे जळून खाक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

coffee apple iphone smartphone

आता याची चोरी होते ! १४ कोटीचा डेटा चोरीला गेला !

May 21, 2022
शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

May 20, 2022
वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

May 20, 2022

बारामतीसह राज्यातील करिअर अकॅडमींच्या नफेखोरीचा बाजार उठणार? भरमसाठ शुल्कातून पालकांची सुटका होणार? राज्य शासनाने घेतली गंभीर दखल!

May 20, 2022

चक्क ‘बारामती’तून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आंबे पाठवले..! भसाळे यांचं निर्यातीचं ‘इंद्रधनुष्य’! महाराष्ट्रासह ‘बारामती’चा अमेरिकेत रोवला झेंडा..!

May 20, 2022

दुर्दैवी : पाहुण्याच्या गावात आलेल्या पाच जणी भाटघर धरणात बुडाल्या..! तिघींचे मृतदेह सापडले!

May 19, 2022

मुळशीमध्ये अविनाश बलकवडे यांनी आयोजित केला ‘धर्मवीर’ चा मोफत शो!

May 19, 2022

देवेंद्र फडणवीस उद्या (शुक्रवारी) इंदापुरात! नीरा नरसिंहपूरचा करणार दौरा!

May 19, 2022

मळद दरोड्यातील फरार अट्टल दरोडेखोरास यवत पोलीसांनी केले जेरबंद!

May 19, 2022
मतदानासाठी गावी निघालेल्या जोडप्याचा अपघात; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर..

बारामतीत एमआयडीसीतील कंपनीत एका कामगाराचा मृत्यू ! डोक्यात लोखंडी रॉड पडला !

May 19, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group