सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शहा गावचा विकासात्मक कायापालट होत असून उद्या रविवारी (दिनांक 6) रोजी शहा – महादेवनगर भागात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 12 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने व उद्घाटने होणार आहेत अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक व पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांनी दिली.
सतीश पांढरे यांनी सांगितले की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शहा गावचा विकास झपाट्याने होत आहे. भरणे यांच्या माध्यमातून शहा गावच्या विविध विकास कामांसाठी 12 कोटी 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व मंजूर विकास कामांची उद्घाटने राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, राजेंद्र तांबिले, सचिन सपकळ, प्रवीण माने, अभिजित तंबिले, अतुल झगडे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यमंत्री भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहा परिसरात अनेक विकासाची कामे करण्यासाठी पांढरे यांनी योगदान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारचा कार्यक्रम भव्यदिव्य करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.