राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
सर्वाच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षण संदर्भातील अहवाल काल फेटाळला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर आज भाजप आक्रमक झाली असून विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांनी शुक्रवारी विधानभवन प्रांगणात जोरदार निदर्शने केली. दौंडचे आमदार राहुल कुल हे यामध्ये सहभागी झाले होते. कुल यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने दौंड तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल गुरुवारी ( दि.३ ) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला आहे,अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीच्या सरकाला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही. असा आरोप यावेळी भाजपच्या आमदारांनी केला.
यावेळी दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी जोरदार घोषणाबाजी करीत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले.