पुणे : महान्यूज लाईव्ह
पावनखिंड या चित्रपटामुळे बाजी प्रभू यांच्या व बांदल सेनेच्या पराक्रमाची शौर्यगाथा प्रत्यक्षात मोठया पडद्यावर पहाण्याचे भाग्य लाभले व त्यामळे खऱ्या अर्थाने बाजी प्रभू फक्त समजलेच नाहीतर ह्रदयात स्थान निर्माण झाले आणि त्याचे पूर्ण श्रेय जाते ते या चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर व सर्व कलाकार यांना.
दिगपाल लांजेकर यांचे मनापासून खूप खूप आभार. आत्तापर्यंत तुम्ही शिवाजी महाराज व त्यांचे शिलेदार यांच्यावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आणि त्यामुळे आत्ताच्या पिढीला शिवाजी महाराज व त्यांचे मावळे खऱ्या अर्थाने समजत आहेत आणि त्यांच्याबद्दल आदर प्रेम निर्माण होत आहे. असेच चित्रपट पुढेही आपण प्रदर्शित करावेत अशी आपणास विनंती.
मुंढवा येथील जोगेश्वरी मिसळचे मालक संजय कोरे हे पावनखिंड पाहून इतके प्रभावित झाले आहेत कि प्रत्येकाने हा चित्रपट पहावा म्हणून पावनखिंड पाहून येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी मिसळवर 20 टक्के सूट ठेवली आहे. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्यांच्या या उत्तम कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर चिटणीस योगिता गोसावी यांनी मुंढवा येथील त्यांच्या जोगेश्वरी मिसळ येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले.
शिवभक्त संजय कोरे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येकाला समजलाच पाहिजे त्यासाठी असे चित्रपट लोकांनी आवर्जून पाहिले पाहिजे व मुलांना पण दाखवले पाहिजेत. यावेळेस पर्वती विधानसभा सरचिटणीस संगीता पिंगळे व लतीफ सय्यद उपस्थित होते.