मुंबई : महान्यूज लाईव्ह
युक्रेनच्या युरोपातील सर्वात मोठ्या अणुउर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्याने सारे जग हादरून गेले आहे. या अणुउर्जा प्रकल्पातून जर अणुगळती झाली तर संपूर्ण युरोपला त्याची झळ पोचू शकते. सध्या मात्र हल्ल्यानंतर प्रत्यक्ष अणुभट्टीला कोणतीही झळ पोचली नसल्याचे आणि अणुगळतीची शक्यता नसल्याचे युक्रेनमधील या अणुउर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या हल्ला झाल्याचे समजल्यानंतर साऱ्या जगात विषेशत: युरोपात घबराट पसरली. युक्रेनचे अध्यक्ष झेलेंन्सी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
रशियाचे अध्यक्ष पुनीत हे सगळ्या युरोपची सुरक्षा धोक्यात आणत आहेत, अशी टिका इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यावेळी केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी जॉन्सन यांनी केल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.