बारामती : महान्यूज लाईव्ह
आत्तापर्यंत साडेतीन हजारहून अधिक दांपत्यांना अपत्य प्राप्तीचे सुख मिळवून देण्यासाठी यशस्वी उपचार केलेल्या बारामतीतील श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेगळा उपक्रम 11 जात असून गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रिया व प्रसूतीनंतरच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याचे सेंटरने ठरवले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी तसेच पिवळी व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे.
स्त्रिया या नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे कमी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते अशावेळी त्यांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या महागाईमुळे आणि कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे हा खर्च स्त्रिया टाळतात.
अशावेळी या सर्व सुविधा महिलांसाठी कमी खर्चामध्ये व्हाव्यात यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर महिलांच्या गरोदरपणातील व प्रसूतीनंतर च्या शस्त्रक्रिया विशेष सवलतीत करणार आहे.
आतापर्यंत 3500 जास्त अपत्यहीन जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर ने साकार केले आहे. याच धर्तीवर स्त्री आरोग्य समस्या कमी करण्यासाठी विशेष सवलतीमधील या उपक्रमाचा मध्यम वर्गीय तसेच गरीब कुटुंबीयांना लाभ व्हावा हाच या मागचा उद्देश असल्याचे सेंटरचे प्रमुख डॉ. आशिष जळक यांनी सांगितले.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असेल तर त्यांच्यासाठी ही सवलत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी हॉस्पिटल च्या पत्त्यावर किंवा मोबाईल (8484861900, 9527071814) नंबर संपर्क साधून संपूर्ण माहिती घेऊ शकता.