मुंबई : महान्यूज लाईव्ह
ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांना काही दिवसापूर्वी अटक केली होती. त्यांच्या कस्टडीची मुदत आज ( ३ मार्च ) रोजी संपत होती. आज ईडीच्या विशेष न्यायालयात त्यांना पुन्हा ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र यावेळी ईडीची एक मोठी चूक नवाब मलिकांचे वकिल अमित देसाई यांनी उघडकीस आणली आहे.
ईडीने नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडींगचा आरोप ठेवला होता. या आरोपपत्रात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला ५५ लाख रुपये नवाब मलिक यांनी दिल्याचे ईडीने म्हणले होते. ही रक्कम टेरर फंडीग म्हणजे दहशतवाद्यांनी मदत असल्याचे ईडीने म्हणले होते.
आज ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात हीच रक्कम ५ लाख रुपये दाखविली असल्याचे नवाब मलिकांच्या वकिलांनी सांगितले. यावर ईडीने पहिल्या आरोपपत्रात ‘ टाईप मिस्टेक ‘ झाली होती. प्रत्यक्षात ही रक्कम ५ लाखच असल्याचे ईडीने सांगितले.
यावेळी अमित देसाई यांनी ईडीवर अनेक आरोप केले. आम्ही माहिती मागितली की गोपनियतेचे नियम सांगितले जातात मात्र या प्रकरणाची सगळी माहिती मिडियामध्ये मात्र येत आहे. ही माहिती मिडियाला कशी मिळते हे ईडीने सांगावे असे अमित देसाई म्हणाले. २५ वर्षानंतर आरोप केले जातात. अंडरवर्ल्डशी निगडित लोकांच्या विधानावर ईडीचा विश्वास आहे. गुन्हेगारी जगतातील व्यक्ती अचानक २५ वर्षानंतर विश्वासार्ह बनली आहे, असा आरोपही अमित देसाईंनी केला.
दरम्यान ईडीने नवाब मलिकांची चौकशी अपूर्ण राहिली असल्याने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानूसार न्यायालयाने ७ मार्चपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे.