मुंबई : महान्यूज लाईव्ह
महानायक अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा खुप काळ प्रतिक्षेत असलेला चित्रपट ‘ झुंड ‘ ४ मार्चला रसिकांच्या भेटीसाठी येत आहे.
या चित्रपटाव्दारे नागराज मंजुळे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटावर नामवंतांकडून स्तुतीचा वर्षाव होत आहे. आमिर खान तसेच दक्षिणेतील सुपरस्टार धनुषसाठी या चित्रपटाचे प्रायव्हेट स्क्रिनिंग करण्यात आले होते. हा चित्रपट पाहताना आमिर खानच्या डोळ्यात पाणी आलेले दिसले तर धनुषनेही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.
झुंड मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ सैराट ‘ मधील रिकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्याही भुमिका आहेत. नागराज मंजुळे यांच्याच ‘ फॅंड्री ‘ मधील प्रमुख कलाकार सोमनाथ अवघडे यानेही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात बारसे यांची भुमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे.
नागराज मंजुळेंने आपल्या दिग्दर्शनाची आगळीवेगळी शैली यापूर्वीच्या त्यांच्या चित्रपटातून दाखविलेली आहे. आता ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने रसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत.