मुंबई : महान्यूज लाईव्ह
सांगली जिल्ह्यातील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बॅंकेचा परवाना रिझर्व्ह बॅंकेने काल रात्री रद्द केला आहे.
काल याबाबत काढलेल्या परिपत्रकात रिझर्व्ह बॅंकेने शिराळ्यातील या बॅंकेचा सर्व कारभार बंद करण्याचे आदेश दिले असून बॅंकेवर रिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. बॅंकेच्या ठेवीदारांना ५ लाखांपर्यंतच्या ठेवीची रक्कम परत मिळणार असून ९९ टक्के ठेवीदार या मर्यादेतील असल्याची माहिती आहे.