सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर महाराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.त्याचप्रमाणे मंदिराच्या प्रांगणात १०८ लिंगांचा लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे भाविकांची संख्या वाढलेली दिसून आली. यावेळी अभिषेकासाठी नागरिकांना उत्तम प्रतिसाद दिला. हा अभिषेक तब्बल सात तास चालला होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या या लघुरुद्र , अभिषेकासाठी निमगाव केतकीचे समस्त ग्रामस्थ व कचरनाथ बाबा सेवा मंडळाने उत्तम नियोजन केले होते. लघुरुद्र अभिषेकासाठी भव्यदिव्य असा मंडप डेकोरेशन करण्यात आले होते. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या जवळील गावच्या बारव मध्ये विद्युत रोषणाई मध्ये लावलेले पाण्याचे कारंजे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते..