बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत १३ नोव्हेंबरला एका मनोरुग्णाच्या हल्ल्यात भाजीविक्रेते फारुक ( चाचा ) तांबोळी यांचा मृत्यू झाला होता. फारुकचाचांच्या घरात ते एकटेच कमावते होते. त्यांच्या अशा अपघाती मृत्यूने त्यांच्या पत्नी आणि तीन मुली, एका मुलावर आभाळ कोसळले.
अशा परिस्थितीत त्यांचा समाज त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभा राहिला. फारूक यांची मोठी मुलगी तब्बसुम हिचा विवाह म्हस्कोबाची वाडी येथील मुलगा समीर याच्याशी ठरला, घरात करता माणूस नसल्याची उणीव- जाणवत असताना अंजुमन इत्तेहाद जमात बारामतीने विवाहाचा सगळा खर्च उचलला. या विवाह सोहळ्यासाठी बारामती शहर पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे देखीलउपस्थित होते.
या विवाह सोहळ्यासाठी वीस हजाराची मदत पिंपरी चिंचवड तांबोळी जमात अध्यक्ष ताज्जुदिन भाई आणि तांबोळी पदाधिकारी बांधव यांनी दिली.
तांबोळी जमात पुणे शहर अध्यक्ष नजीरभाई धायरीवाले यांनी दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपये रोख मदत दिली.
या सोहळ्यासाठी सर्व नियोजन पुढाकार घेऊन बारामती तांबोळी समाज अध्यक्ष मुनिर तांबोळी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य जावेद तांबोळी , बशीर तांबोळी, अफजल तांबोळी, युसुफ तांबोळी, इम्रान तांबोळी, असलम तांबोळी, जाहगींर तांबोळी, आरीफ तांबोळी, तोसीब तांबोळी, अरबाज तांबोळी
यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक , मस्जिदभाई तांबोळी, कबीरभाई तांबोळी, रशिदभाई तांबोळी , राजुभाई तांबोळी, रमजान भाई तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून परिश्रम घेऊन हा विवाह सोहळा पार पाडला…