अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पुणे येथील इन्फिनिटी आयएएस अकॅडमी च्या नवीन शाखेचे नुकतेच दिल्ली येथे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आयएएस अधिकारी दिपक शिंदे यांनी अत्यंत सोप्या शब्दात त्यांच्या यशाचे गमक सांगितले.
अभ्यास करताना अभ्यासक्रमाची चौकट समजून घेतली, सातत्य ठेवले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर यश नक्की मिळते असे त्यांनी नमूद केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली मध्ये दरवर्षी महाराष्ट्र मधून खूप मुले येतात त्यांच्यासाठी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण, चाचणी परीक्षा, मुलाखतीची तयारी हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीच्या राजेंद्रनगर येथे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास दिल्ली नागरी लेखा अधिकारी अमित भोळे, इन्फिनिटीचे गिरीश खेडकर, ऋतुराज काळे, स्वप्नील भोर, श्री इन्फिनिटी अकॅडमीचे शिक्षक भूषण देशमुख, सचिन कदम उपस्थित होते.
अमित भोळे यांनी समतोल आणि वेळेचे नियोजन याचे महत्त्व सांगितले. श्री गिरीश खेडकर यांनी ज्या प्रकारे दर्जेदार कामगिरीने आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला, तोच विश्वास आम्ही दिल्लीत निर्माण करू असे सांगितले. मृणालिनी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.