दौंड : महान्युज लाईव्ह
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व सम्राट चंद्रगुप्त मोर्य यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राज्यपालांचे हे विधान अपमानकारक आहे. या विधानाचा दौंड तालुका संभाजी ब्रिगेडने निषेध केला असुन राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे मागील दोन दिवसांपासून मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या दौंड बंद मध्ये सहभागी आवाहनही करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि समस्थ बहुजन समाजाचे प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी नसते तर घडले नसते त्यांना कोणी विचारले नसते, चंद्रगुप्त मौर्य हे ही चाणक्य मुळे घडले आहेत असे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केले होते. कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा ऐकेरी उल्लेख करून अपमान केला आहे, यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे इतिहासाला धरून नाही तसेच ते विधान महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणास बिघडवणारे आहे. राज्यपाल पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने असे विधान करणे लजास्पद आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवराय यांच्या चरणी जावुन तात्काळ माफी मागावी. तसेच याबाबत दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा होणा-या परिणामास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जबाबदार राहतील. महाराष्ट्रामध्ये अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. याबाबत दौंड संभाजी ब्रिगेडने तहसीलदार यांनी निवेदन दिले आहे.