इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर येथे जेष्ठ नागरिक संघ आणि रोटरी क्लब यांनी शनिवारी २६ फेब्रुवारी रोजी जेष्ठ नागरिकांना मनोरंजनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील कलाकार विनायक काळे आणि श्रीरंग अवधानी यांनी विनोदी किस्से, मिमिक्री, कथा, कविता आणि विडंबन गीतांचा असा ‘ खमंग कळबोळी ‘ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास इंदापूरातील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष उदय शहा, नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, संघाचे सचिव हनुमान शिंदे, रोटरीचे सचिव भीमाशंकर जाधव, संघाचे संचालक प्रमोद भंडारी, जेष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे, उपाध्यक्ष पांडुरंग जगताप, भाऊसाहेब खबाले, खजिनदार विष्णुपंत चौधरी आदी उपस्थित होते. महाजन सर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमानंतर श्रीरंग अवधानी यांनी इंदापूरकरांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.