सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरची मालोजीराजांची ऐतिहासिक ओळख टिकवण्यासाठी माझे प्रयत्न असून त्यादृष्टीने मी पावले टाकत आहे. यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून, पुढील सप्ताहात होत असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा विषय आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानी घालणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
रविवारी राज्यमंत्री भरणे यांनी काल ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरात आरती केली. व सर्वसामान्य, शेतकरी, व्यापारी यांची कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा चांगली बसावी यासाठी इंद्रेश्वराला साकडे घातले.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा छत्रपती मालोजीराजांची वीरभूमी म्हणून शहराची ओळख असून भविष्यात ही ओळख टिकून राहावे यासाठी माझे प्रयत्न असतील त्यादृष्टीने मी पावले टाकत आहे.या दृष्टीने मी स्वतः लक्ष घालून इंदापूर शहराचा आराखडा तयार करणार आहे. निश्चित इंदापूर शहरातील माझे बंधू भगिनी नागरिक या कामी मला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. पुढील सप्ताहात राज्याचा अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानी हा विषय देखील मी घालणार असल्याचे भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.