सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रीय पोलिओ निवारण कार्यक्रमांतर्गत सुरू आज सर्वत्र ‘ पल्स पोलिओ मोहीम ‘ राबविण्यात आली. देशातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी ही मोहीम राबविली जात असून या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रे व उपकेंद्रावरही मोहीम राबविण्यात आली. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हिंगणगाव व काटी या दोन ठिकाणी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य अभिजीतभैय्या तांबिले यांच्या हस्ते करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील आशा सेविका व अंगणवाडी कर्मचारी यांची राष्ट्रीय पल्स पोलिओ निवारण मोहिमेत महत्वाची भूमिका आहे. या भागात झालेल्या पल्स पोलिओ मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती अभिजीत तांबिले यांनी दिली.