शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे विहिरीत महिलेचा व मुलीचा मृतदेह आढळून आला असल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गणेगाव खालसा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा तसेच मुलीचा मृतदेह आढळून आला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अनोळखी मृतदेहाचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली होती. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला लता शिवाजी घोडे ही मलठण फाटा,शिक्रापूर येथे राहणारी असून ती मुलगी प्रगती हिला घेऊन क्लासला जाते असे सांगून घरातून निघून गेली होती. तिची बेपत्ता झाल्याची खबर तिचे पती शिवाजी यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे.
सदर महिलेने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.