राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : रशिया व युक्रेन युध्द सुरू आहे, त्यामुळे तेथे परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच युक्रेन येथे दौंड तालुक्यातील तब्बल सात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेलेले आहेत. युध्दामुळे ते मागील चार दिवसांपासुन अडकले आहेत. या विद्यार्थांना भारतात आणि त्यांच्या घरी सुखरूप आणावे अशी विनंती केडगाव येथील डॉ.वंदना मोहिते यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केली आहे.
जाफरोझिया येथे वैद्यकिय क्षेत्रातील एम बी बी एस या पदवीसाठी प्रथम वर्षासाठी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील तेजस दिनेश मोहिते तसेच एकाच कुटुंबातील तीघे जण असे सात विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. पालक मुलांना घरी आणण्यासाठी चिंतातुर झाले असुन ते कधी घरी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तेजस दिनेश मोहीते (वय १९), दिग्वजय दशरथ माळी, ऋत्विक रमेश शिर्के,रुतुजा रमेश शिर्के, प्रतिक रमेश शिर्के, आविष्कार अरुण मुळे, पीयुष विकास थोरात (सर्व रा.दौंड) रशियाचे सीमारेषेपासून खूप लांब अंतरावर हे विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आठशे किमी अंतरावर एअरपोर्ट आहे.
एअरपोर्टवर जाण्यासाठी त्यांना वाहन नाही, जेवण्याची सोय नाही. अंत्यत हलकीचे दिवस मागील चार दिवसांपासून दिवस काढत आहेत. या मुलांकडे पैसे नाहीत तसेच त्यांना बाहेर पडता येत नाही व मोबाईल रेंज प्रोब्लेम मुळे व्यवस्थित संपर्क होत नसून बोलणेही होत नाही.आम्हाला येथुन घेऊन जा अशी याचना मुले याचना करत आहेत.
रशिया व युक्रेन युध्दाच्या परिस्थितीत होत असलेल्या बॉम्ब हल्यामुळे मुले घाबरली आहेत.जाफरोझीया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये भारतातील तब्बल चोदाशे सहा बंकर मध्ये अडकले आहेत. यामध्ये दौंड तालुक्यातील वैद्यकीय व्यवसाय क्षेत्रातील आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डाॅ.वंदना मोहिते यांचे चिरंजीव तेजस दिनेश मोहिते हा युक्रेन येथे अडकले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डाॅ. वंदना मोहिते यांनी सांगितले की, मुले या युध्दजन्य परिस्थितीमुळे घाबरले आहेत. त्यांना जेवन पाणी मिळत नसल्याने हाल होत आहेत. याबाबत मी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्या शी संपर्क साधला आहे.
माझी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, भारतातील सर्व विद्यार्थी सुखरूप आणावेत. दौंडचे तहसीलदार संजय पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांचे फोन आले असून आम्ही सरकार कडे प्रयत्न करत आहेत असे सांगितले आहे.