सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भवानीनगरच्या ऊस तोडणी कामगारांच्या कोपीवर जाऊन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामांनी लहान मुलांना पल्स पोलिओचे लसीकरण केले..
आज सकाळी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी कारखानाच्या ऊस तोडणी कामगार यांच्या कोपीवर गेले.तेथील लहान मुलांना मामांनी हाताने पल्स पोलिसो लसीकरण करून शुभारंभ केलाय. राज्यमंत्री येथील ऊस तोडणी कामगार यांच्या कोपीवर जाऊन लहान मुलांना पल्स पोलिओचे लसीकरण केले.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रताप पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, सणसरचे सरपंच ॲड. रणजित निंबाळकर, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, माजी सरपंच यशवंत नरुटे आदी उपस्थित होते.