शिरूर : महान्यूज लाईव्ह
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या मराठवाडा विभागीय कार्यकारणी सदस्य पदी प्राचार्य विवेक महावीर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फार्मासिस्ट क्षेत्रामध्ये फार्मासिस्टवर होणार अन्याय दूर व्हावा व विविध प्रश्नांसाठी सातपुते यांनी महाराष्ट्रभर सातत्याने उत्कृष्ट काम केले आहे. कोरोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेशउपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी, प्रदेशसचिव रोहित वाघ , मराठवाडा विभागीय अध्यक्ष उमेश लकडे, उपाध्यक्ष विशाल शिंदे,सचिव सागर शिंदे, सल्लागार गजानन कुचके, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष व विभागीय प्रमुख वैभव बोडके यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर बोलताना प्रा.सातपुते यांनी सांगितले की, यापुढेही संघटनेच्या माध्यमातून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेऊन काम केले जाणार आहे. प्रा.सातपुते यांचे निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.