सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सुडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
याबाबत गारटकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्र सरकारच्या ईडीने सूडबुद्धीने कारवाई केली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या शुक्रवारी सायंकाळी चार वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी प्रचंड संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.