सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. या दर्गाहच्या व परिसराच्या विकासासाठी आपण यापूर्वी कायम सहकार्य केले असून आगामी काळातही सहकार्य करण्यासाठी आपला सतत पुढाकार असेल,अशी ग्वाही माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील हे मंगळवारी ( दि.२३ ) नीरा नदीकाठच्या परिसरातील काही गावांमध्ये दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्गाहला भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली.दर्गाहचे दर्शन घेतले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
यावेळी शेती पंपाची वीज खंडित मोहीम, शेतकऱ्यांच्या पालखी मार्गाच्या अडचणीच्या जागेवरून संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.