दौंड :महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील दरोड्यातील आरोपीला यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने श्रीगोंदा तालुक्यातुन अटक केले आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. मोहन पाणीदार काळे ( रा.तांदळी धावडे वस्ती ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर ) असे या आरोपीचे नाव आहे. २२ आक्टोंबर २०२१ रोजी पाटस ( कुंभारगल्ली ता.दौंड जि. पुणे ) ग्रामपंचायत सदस्या सायराबानू नुरुद्दीन शेख यांचे राहते घरावर सात ते आठ दरोडाखोरांनी दरोडा घालून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील मोहन पाणीदार काळे हा फरार झाला होता. तो श्रीगोंदा बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला मिळाली होती.त्यानुसार पोलीस पथकाने वेषांतर करून आरोपी मोहन काळे तांदळी येथुन ताब्यात घेतले. काळेवर दौंड,कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, गृह विगागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक रामदास जगताप, सायबर पोलिस स्टेशन चे पोलीस हवालदार सचिन गायकवाड, महेश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.