सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथील युवा नेते समीर भारत मोरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते कार्यक्रमात समीर मोरे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले.
समीर मोरे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष व पुणे जिल्हा उपाध्यक्षपदही भूषविले होते.
मोरे यांनी पक्ष संघटना वाढविण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत युवक संगठन चांगले केले. कोविड काळात अनेकांना सहकार्य केले आहे.आपल्या कार्याची दखल घेऊन मला जिल्हा उपाध्यक्षपदी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. असे सांगत समीर मोरे यांनी पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याची ग्वाही देत सर्वांचे आभार मानले आहेत.