माणिक पवार
भोर : महान्युज लाईव्ह
शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या विवाहित महिलेलाचा विनयभंग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र घटनेला तेरा दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर भोर पोलिस स्टेशनच्या आवारात आरपीआय आठवले गटाचे आणि भीम आर्मीचे पदाधिकारी आणि महिला जमा झाले होते. आरोपीला तात्काळ अटक न केल्यास पोलीस रास्तारोको आंदोलन करण्याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
जातीवाचक शिवीगाळ करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष धर्मु खोपडे रा. नाटंबी ( ता. भोर ) याच्यावर भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हि घटना दि. ९ फेब्रवारी रोजी सांयकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ओव्हाळ, भिमआर्मी भोर तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, आरपीआयचे भोर तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष राहुल कांबळे, वेल्हे तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड, सुनिल मोरे, सागर जगताप, सचिन अडसूळ यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. याप्रकरणी पोलीस पथक आरोपीच्या शोधात असून आरोपीला अटक करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक दबडे यांनी उपस्थिताना ग्वाही दिली आहे.
दरम्यान, घटनेच्या दिवशी पीडित महिला हि नीरानदी पात्रलगत शेळ्याना घेऊन चरायला घेऊन गेल्या होत्या. पीडित महिला सायंकाळी परतत असताना खोपडे याने महिलेलेला रस्त्यात अडवून ‘ तुझ्याशी बोलायचे आहे ‘ असे सांगितले. यावर पीडितेने बोलण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी खोपडे याने पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृत्य करून जबरदस्ती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने यातून कशीबशी आरडाओरड करून सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र खोपडे याने डोंगर टेकडीच्या दिशेने पलायन करतेवेळी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा सापडशील, सोडणार नाही अशीही धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.