दौंड : महान्युज लाईव्ह
पुणे महानगरपालिकेची पीएमपीएल बस उद्यापासून गुरुवार पासून हडपसर – पाटस ते कुरकुंभ पर्यंत सुरू होणार आहे.मात्र पाटस येथील नियोजित बस थांब्यावर आजूबाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे सध्या हा बस थांबा अतिक्रमणाचा विळख्यात आहे. राजकीय वरदहस्त असलेली ही अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कठोर पावले उचलणार का ?
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे गुरूवारी ( दि.२४ ) पुणे महानगर परिवहन मंडाळाची पीएमपीएलची बस हडपसर-पाटस ते कुरकुंभ अशा फेरी सुरू होणार आहे तसे नियोजन ही पुणे महानगर परिवाहन मंडळाचे वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी केले आहे. गुरुवारी ही सेवा सुरू होणार असूनही पाटस मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने कसलेच नियोजन केले नसल्याचे चित्र आहे.
सध्या पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या पाटस गावच्या बाजुला नियोजित बस स्थानकच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. त्यामुळे सध्या बस थांबा हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या अतिक्रमणामुळे बसला व प्रवाशांना थांबण्यास पुरेशी जागा नाही. यामुळे बस व प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात गटाची सत्ता आहे आणि ही बस सुरू करण्यासाठी थोरात यांनी पाठपुरावा केला आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनालाही अतिक्रमणे काढून कठोर कारवाई करावी लागणार आहे. काही राजकीय हितसंबंध असलेल्या कार्यकर्त्यांची ही अतिक्रमणे आहेत. ग्रामपंचायतीने त्वरीत ही अतिक्रमणे काढून बसथांब्याचा परिसर मोकळा करावा अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांनी केली आहे.