मुंबई : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी आपल्या घरी ‘ सरकारी पाहूणे ‘ येणार असल्याचे वक्तव्य करत आपल्यामागेही केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. आज पहाटे हे सरकारी पाहूणे म्हणजेच ईडीचे अधिकारी नवाब मलीक यांच्या घरी पोचले.
नवाब मलीक यांना सात वाजण्याच्या सूमारास ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
नवाब मलीक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते असून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्रीही आहेत.
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिक यांनी लक्ष घातले होते, तेव्हापासून त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती