सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गतवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदापूर शहरातील बायोडायव्हर्सिटी पार्क येथे लावण्यात आलेल्या जांभूळ जातीच्या झाडांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी जांभळीची सर्व झाडे देखभाल करुन जगवणा-या इंदापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही काँग्रेस कमिटीने केला.यावेळी इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता शहा उपस्थित होत्या.
लवकरच ह्या जांभळीच्या झाडाचे जांभळाचे फळ इंदापूर शहरातील नागरिकांना खाण्यास मिळावे, अशी अपेक्षा इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केली.
यावेळी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस जाकिर काजी, शहर अध्यक्ष चमन बागवान, उपाध्यक्ष तुषार चिंचकर, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, निवास शेळके, महादेव लोंढे, भगवान पासगे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.