माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथडी येथील शालेय बालचमूनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले. यामुळे शाळेमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाल्याने चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथडी ( ता. भोर ) येथील विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एल.एल.तेली, शिक्षिका रिबिका मनेकर, संगीता वीर,अर्चना दळवी, माधुरी बांदल, रत्नमाला निगडे व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवरायांच्या, वीर मावळ्यांच्या कथा, पराक्रम याबाबत इयत्ता सातवीचे विद्यार्थ्यांनी कथन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे, पोवाडे, पाळणे गीत गायन करून शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला. इयत्ता पहिलीच्या पृथ्वीराज आणि श्रेया इंगुळकर यांनी भाषण व नृत्य करून ऑनलाईन व्हिडिओद्वारे शिवजयंतीचा उत्साह व्यक्त केला. नंतर खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले.