शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे बार असोसिएशन च्या उपाध्यक्षपदी ॲड.लक्ष्मण येळे यांची बहुमताने निवड झाली.
पुणे बार असोसिएशन ची नुकतीच निवडणूक पार पडली.खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत १५५० मते मिळवून ते विजयी झाले.
ॲड.लक्ष्मण येळे हे शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील सुपुत्र असून अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आहे. सन २००८ पासून ते दिवाणी, फौजदारी महसूल विभागात प्रॅक्टिस करत असून त्यांनी पुणे जिल्हा न्यायालय,शिरूर न्यायालय, खेड न्यायालय, सासवड न्यायालय येथे वकिली क्षेत्रात काम केले आहे.
पुणे बार असोसिएशन निवडणुकीत उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्यानंतर शिरसगाव काटा ग्रामस्थांनी तसेच शिरूर तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.