संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार पत्रकार संघाकडून आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या निर्देशानुसार ही जयंती साजरी करून लोणार तालुका पत्रकार संघाकडून अभिवादन करण्यात आले. या वेळी आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर पत्रकार संघाचे मार्गदर्शक डॉ अनिल मापारी व अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी प्रकाश टाकला.
या वेळी लोणार तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक डॉ अनिल मापारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, उपाध्यक्ष संदीप मापारी, सचिव पवन शर्मा, कोषाध्यक्ष शाम सोनुने, प्रसिद्धी प्रमुख अनिल वायाळ, प्रवक्ते राहुल सरदार, सहकोषाध्यक्ष किशोर मोरे, सदस्य विठ्ठल घायाळ, अशोक इंगळे उपस्थित होते.