संदीप मापारी पाटील, बुलढाणा
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिवसेनेने पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यास संपर्कप्रमुख, खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थित राहून शिवसेना- युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी तसेच शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, शिवसेना नेते दिवाकर रावते, पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद नेरकर, माजी मंत्री आमदार संजय राठोड, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार नितीन देशमुख,जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, प्रा. नरेंद्र खेडेकर तसेच विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.