महान्यूज लाईव्ह विशेष
गेले काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाकडे असणारी संप्पती वाढत चालली आहे. पण आता भाजपाने इतर सगळ्या पक्षांना याबाबतीत खुप मागे टाकले आहे.
२०१९ – २० मध्ये भाजपाची एकुण संपत्ती रु. ४८४७ कोटी इतकी होती. याचवेळेस देशपातळीवरील दुसरा पक्ष असलेल्या कॉंग्रसची संप्पती इतर प्रादेशिक पक्षांपेक्षाही कमी झालेली दिसून आली.
भाजपानंतर सर्वाधिक संप्पती बहुजन समाज पार्टीकडे आहे, पण हा आकडा रु.६९८.३३ कोटी म्हणजेच भाजपापेक्षा खुपच कमी आहे. यानंतर कॉंग्रेसकडे रु.५८८ कोटी इतकी संपत्ती आहे.
समाजवादी पार्टीकडे रु. ५६३.४७ कोटी , तेलंगणातील टीआरएसकडे ३०१.४७ कोटी, एआयएडीएमके कडे २६७.६१ कोटी इतकी संप्पती आहे.
भारतातील ६ देशपातळीवरील आणि ४४ राज्यपातळीवरील पक्षांची एकुण संप्पती रु. ६९८८ कोटी व रु.२१२९ कोटी इतकी आहे. देशपातळीवरील पक्षांच्या एकुण संपत्तीतील भाजपाचा वाटा जवळपास ७० टक्के ऐवढा आहे.
एकेकाळी कॉंग्रेस पक्षाकडे असणारा निधी हा सर्वाधिक होता, आता ती जागा भाजपाने घेतली आहे.