महान्यूज लाईव्ह टीम
कोरोना विषाणूचा एक नवा अवतार चीनी संशोधकांनी समोर आणला आहे. निओकोव्ह असे नाव दिलेला हा व्हायरस भविष्यकाळात मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो असे यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात म्हणले आहे.
कोरोना विषाणू हे असंख्य विषाणूंचे कुटुंब आहे, ज्यातील एक दोन विषाणूच सध्या मानवी शरीरापर्यंत पोचलेले आहेत. याव्यतिरिक्त असंख्य कोरोना विषाणूंचे प्रकार प्राण्यांच्या शरिरामध्ये सापडतात. परंतू भविष्यकाळात जो विषाणू मानवी शरिरात प्रवेश करू शकेल अशा एका विषाणूबाबत चीनी संशोधकांनी इशारा दिलेला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू मानवी शरिरात प्रवेश केल्यावर श्वसन यंत्रणेवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे रुग्ण कमी वेळात गंभीर अवस्थेला पोचू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूबाबत अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे म्हणले आहे.
ज्या चीनी संशोधकाने याबाबतच्या शोधनिबंधात म्हणले आहे की, निओकोव्ह हा मानवी शरिरात प्रवेश करण्यासाठी केवळ एक म्युटेशन दूर आहे.