संदीप मापारी पाटील
बुलढाणा : महान्यूज लाईव्ह
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेंदुर्जन पंचायत समिती सर्कलमधील विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सिंदखेड राजा पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उपसभापती सौ.अश्विनीताई बोडखे व बद्रीनाथ बोडखे यांच्या अथक प्रयत्नातून व निधीअंतर्गत शेंदुर्जन पंचायत समिती सर्कलमधील मौजे आंबेवाडी, शेंदुरर्जन,जागदरी,भंडारी,कंडारी,तांदुळवाडी,पांग्री काटे,सायाळा, राजेगाव या गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या शुभहस्ते तसेच सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी शिवसेनेचे बाबुराव मोरे, तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,नगराध्यक्ष सतीश तायडे,दामुअण्णा शिंगणे, नगरसेवक राजेंद्र आढाव, प्रा.सिद्धेश्वर आंधळे, वैभव देशमुख, महेंद्र पाटील,गजेंद्र देशमुख, प्रंशात मेरत, शंकरराव जायभाये, शंकरराव उगलमुगले, संदीप मगर,सरपंच मदन कायंदे,सरंपच गोपाल नागरे, जागदरी, सतीश जायभाये,सायाळा, संदीप लंबे,राजेगाव, उमेश शेजुळ,सरपंच शिवाजी थिगळे, उपसंरपच सुभाष आंभोरे, प्रशांत जायभाये, आदित्य काटे, शुभम पोहरे,यांच्यासह ग्रा.पं.सदस्य, शिवसेना-युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.