महान्यूज लाईव्ह विशेष
नावाने हाक मारली आणि नावापुढे ‘ भाई ‘ लावले नाही. भाईचा केवढा मोठा अपमान ! मग भाई सोडतो की काय.
पिंपरी चिंचवडमधील थेरगावमध्ये एका वीस वर्षाच्या तरुणाला या कारणावरुन जमिनीवर पडलेले बिस्किटाचे तुकडे जबरदस्तीने खायला लावले आणि त्याला मारहाण केली. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी अॅक्शन घेऊन तीन जणांना अटक केली. या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
हा सगळा प्रकार केवळ नावाने हाक मारली आणि नावापुढे ‘ भाई ‘ लावले नाही ऐवढ्या कारणामुळे घडला आहे. हा प्रकार मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओही काढण्यात आला, आणि तो व्हायरल करण्यात आला.
पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करीत आहेत.