महान्यूज लाईव्ह टीम
टिव्ही सिरियलची नामवंत अभिनेत्री श्वेता तिवारी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे वादात सापडली आहे. ‘ मेरे ब्रा का साईज भगवान ले रहे है ‘ असे हे विधान होते.
श्वेता तिवारीने तिच्या आगामी वेबसिरीजच्या उद्घाटनाच्या वेळी हे विधान केले. याचे व्हिडिओ सगळीकडे अपलोड होऊ लागले आणि श्वेता प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली. तिच्या विरोधात भोपाळमध्ये पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे. यानंतर तिने इंन्स्टाग्रामवर पोस्ट करून माफी मागितली आहे.
मी जे बोलले होते, त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. सौरभ जैन याचा देवाच्या रुपातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला उद्देशून मी ‘ भगवान ‘ हा शब्द वापरला होता. परंतू माझ्या या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. मी स्वत: देवाला मानते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. परंतू जर अजाणतेपणी माझ्या या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी विनम्रपणे माफी मागते, असे तिने या पोस्टमध्ये म्हणले आहे.
आता हे प्रकरण ऐवढ्यावरच थांबते की, श्वेताला पोलिस स्टेशन आणि न्यायालयापर्यंत घेऊन जाते हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल