सामाजिक

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी ! अत्यंत जवळच्यांच त्रासाला कंटाळून केली आत्महत्या !

महान्यूज लाईव्ह टीम

महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक राजकारण्यांचे श्रद्धास्थान असलेले भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

भय्यू महाराज यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली इंदूर न्यायालयाने त्यांचा सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक या तिघांना दोषी ठरवले आहे.

हे तिघेही भय्यू महाराज यांच्या जवळचे होते. आश्रमाची सर्व जबाबदारी भय्यू महाराजांनी या तिघांवर सोपवली होती. याचाच गैरफायदा या तिघांनी घेतला. विनायक, शरद आणि पलक यांनी भय्यू महाराजांना पैशांसाठी इतका त्रास दिला की त्यांनी आत्महत्या केली असे न्यायालयाने निकालात म्हणले आहे.

न्यायालयाने आरोपींनी दोषी मानले आहे. त्यांना काय शिक्षा होणार ते आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago