महान्यूज लाईव्ह विशेष
महिलांसाठी रजोनिवृत्तीचा काळ हा कसोटीचा काळ असतो. नैराश्य, मानसिक स्थितीत सतत बदल होणे, शारिरिक दुखणी यांना या काळात महिलांना सामोरे जावे लागते. हा काळ सुसह्य व्हावा यासाठी सतत वैद्यकिय क्षेत्रात संशोधन सुरु आहे. संगितावर आधारित उपचारांनी या काळात नैराश्य कमी होऊ शकते तसेच मानसिकदृष्ट्या स्थिरता येऊ शकते असे या अभ्यासातून पुढे आले आहे.
सांगितिक उपचारामुळे मानसिक तणाव कमी होतो, रक्तदाब कमी होतो हे यापूर्वीदेखील माहिती होते. प्राचीन शास्त्रातही सांगितिक उपचार सांगितले आहेतच.
सांगितिक उपचाराच्या परिणामांचा नेमका काय परिणाम होतो हे अद्याप पुढे आलेले नाही. परंतू संगीत ऐकल्यानंतर नैराश्य कमी होते हा अनेकांचा अनुभव आहे. आता केल्या गेल्या छोट्या प्रमाणावरील अभ्यासातही ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
यामुळे रजोनिवृत्तीच्या काळातील उपचारांमध्ये औषधांसोबत सांगितिक उपचारांचाही समावेश करणे उपयोगी ठरणारे आहे.