शिरूर : महान्यूज लाईव्ह
निमोणे येथे आयोजित केलेल्या रक्तदान व अवयवदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती सरपंच शाम काळे यांनी दिली.
शिरुर तालुक्यातील निमोणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.
यावेळी ५३ रक्तदांत्यानी रक्तदान केले तर ४० युवकांनी अवयवदानाचे महत्व समजून घेत अवयव दान करण्याचा संकल्प करत फॉर्म भरून दिले.यासाठी बुधराणी हॉस्पिटलच्या साधू वासवानी ब्लड बँकने सहकार्य केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच शाम काळे, उपसरपंच राजश्री गव्हाणे यांसह प्रताप थोरात,अमोल थोरात,नितीन काळे, पोपट काळे,नारायण काळे, बिवसेन काळे, सागर काळे, क्षितिज सातव, सुरज काळे,कुलदीप देशमुख,रोहन काळे आदी युवकांनी परिश्रम घेतले.