महान्यूज लाईव्ह विशेष
कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप तसेच इंदापूर कॉंग्रेस कमिटीने आज आक्रमक पवित्रा घेत इंदापूर शहरामध्ये तीन वर्षापासून बंद असलेल्या कॉंग्रेस भवनाचे कुलूप तोडून शेकडो कार्यकर्त्यांसह आतमध्ये प्रवेश केला.
स्वर्गीय शंकरराव पाटील यांनी इंदापूरमध्ये कॉंग्रेस भवन बांधण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले होते. त्यांच्या पश्चात कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कॉंग्रेसभवनमधून सामान्य जनतेला भेटत होते. दोन वर्षापासून हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर कॉंग्रेस भवन धूळ खात पडले होते. या इमारत नेमकी कोणाची हे कोणालाही कळत नव्हते.
आज कॉंग्रेस कार्यकर्ते आणि आमदार संजय जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत इंदापूरचे हे कॉंग्रेस भवनाचा कुलूप तोडून ताबा घेतला. आठवडाभरात कॉंग्रेस भवनाची पूर्णपणे डागडुगी करून कामकाज सुरु करणार असल्याचे संजय जगताप यांनी सांगितले.
संजय जगतापांच्या या आक्रमक पावित्र्याने भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये हर्षवर्धन पाटील आणि संजय जगताप यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे.