अनिल गवळी
पुणे : महान्यूज लाईव्ह
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन समारोह उत्साहात संपन्न झाला. जागतिक किर्तीचे सुवर्णपदक विजेते राष्ट्रीय खेळाडू श्याम सहानी यांच्या शुभहस्ते व डॉ. प्रिती सहानी, वानवडी गावचे सरपंच दत्तोबा जांभूळकर, सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनीलजी गायकवाड, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी अतिथींचे स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्याम सहानी यांनी ” खूप शिका, आयुष्यात चांगली व्यक्ती बना ” असे सांगून क्रीडा प्रकारांची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात मुले आणि मुलींसाठी अनेक संधी आहेत, म्हणून खेळाडू बना. व्यसनांपासून दूर रहा, निरोगी आयुष्याचे हेच रहस्य आहे, असे सांगून शिवरकर साहेबांच्या कष्टांची जाणीव ठेवा आणि खूप शिका व शाळेचे नाव उज्ज्वल करा असे सांगितले. माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागील हेतू स्पष्ट केला. स्वातंत्र्य सैनिक हे आपले भूतकाळातील प्रतिनिधी होते, तर व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी हे वर्तमान आहेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहात. खूप शिका व आपल्या देशाचे व स्वतःचे नाव उज्ज्वल करा. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जागतिक किर्तीचे व्यक्तिमत्व व देशाचा ध्वज उंचावणारे कर्तृत्ववान हात आपल्या ध्वजारोहणास प्रमुख पाहुणे लाभले म्हणून आनंद व्यक्त केला. ब्रांझ ते सुवर्णपदकाचा प्रवास कष्ट, जिद्द व राष्ट्रप्रेम याच्या जोरावर मिळविल्याचे सांगून हाच आदर्श विद्यार्थ्यांनीही ठेवावा असे सांगितले. माजी विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्द्गार काढले. सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनीलजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांची माहिती घेवून क्रीडा क्षेत्रात यश मिळवा व देशाचे व पालकांचे नाव उज्ज्वल करा, असे सांगितले.
याप्रसंगी शाळेच्या हितचिंतक डॉ. सोनालिनी सत्तूर व योगशिक्षिका शालिनी भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी संस्थेच्यावतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.
याप्रसंगी सुदामराव जांभूळकर, दिपक केदारी, अनंता शिवरकर,वकील विजय राऊत, चंद्रकांत तोंडारे, कदम,सुर्यकांत देडगे, सचिन गिरमे, सिद्धार्थ परदेशी, नवाबभाई, यशवंत झगडे, बाळासाहेब हिंगणे, गणेश मोरे, गणेश कवडे, रामदास जगताप, सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीपा व्यवहारे यांनी केले.