माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
भोर आणि गुणंद या पट्ट्यातील मोठ्या संख्येने नागरीक रोज पुणे शहरात कामानिमित्त ये – जा करत असतात, यासाठी कात्रज ते भोर आणि कात्रज ते गुणंद पीएमटी बससेवा सुरू करावी अशी मागणी भोरचे सभापती लहूनाना शेलार यांनी केली आहे. या मागणीला खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे.
भोर आणि गुणंद या दोन ठिकाणी पीएमपीएल बससेवा सुरू करण्याचे मागणीचे निवेदन सभापती लहूनाना शेलार यांच्या हस्ते संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी वसंत बांदल, प्रल्हाद बांदल, परशुराम बांदल, लालासो बांदल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बससेवा सुरू करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शिफारस केली आहे. बस सुरू झाल्यास नागरिकांच्या वेळेची व पैशाची होईल होणार यामुळे उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील चांगली सोय होणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.