अनील गवळी
महान्यूज लाईव्ह टीम
शिक्षणासाठी सात किमीचे अंतर दररोज पार करणारा विद्यार्थी आणि त्याच्या जिद्दीला साथ देत त्या एका विद्यार्थ्यासाठी शाळा सुरु ठेवणारे शिक्षक आहेत अंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर येथील.
बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर येथील प्राथमिक विद्यालयातील गणेश पन्हाळे हा विद्यार्थी. दहा वर्षाचा चौथीत शिकणारा गणेश दररोज सात किलोमीटर अंतर पार करुन सायकलने शाळेत येत असे. कोवीडमुळे शाळा बंद होऊन ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. त्यावेळी त्याला शिक्षणापासून वंचित रहावे लागले. त्यानंतर कोवीडचा प्रभाव कमी झाला, आणि शाळा पुन्हा सुरु झाल्या. पण पुन्हा एकदा कोवीडचा प्रादुर्भाव वाढला आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. परंतू गणेशकडे मोबाईल नसल्याने त्याला ऑनलाईन शिक्षण घेता नव्हते. पण त्याची शिकण्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या एकट्यासाठी शाळा सुरु ठेवली.
गणेशचे वडील अपंग असून आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्याला मोबाईल उपलब्ध झाला नव्हता. माञ गणेश मधील शिक्षणाची जिद्द पाहून त्याच सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे.