महान्यूज लाईव्ह टीम
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ आई कुठे काय करते ‘ मधील आई म्हणजेच मधुराणी प्रभुलकर गेले काही दिवस मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती गेली तरी कुठे असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. आता तिने म्हणजेच मधुराणीने मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे समोर आले आहे.
मधुराणीची तब्येत ठिक नसल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतल्याची माहिती मिळते आहे. तिचे चाहते तिला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मधुराणीने ‘ आता परत जायची वेळ झाली ‘ अशी पोस्ट केली होती, त्यावेळीच ती मालिकेतून बाहेर पडणार असल्याची शंका आली होती, ती आता काही प्रमाणात खरी ठरली आहे.
आता कालच्याच भागात मालिकांच्या नेहमीच्या शिरस्त्यानूसार अरुंधतीच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी आल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे आता काही दिवसतरी अरुंधती या मालिकेत नसणार हे स्पष्ट झाले आहे. पण ती परत येणार का, आणि आलीच तर किती काळाने येणार यावर तिच्या चाहत्यांचे लक्ष आहे.